Maharashtra Superfast News | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर | ABP Majha
महामंडळाची आजची आर्थिक स्थिती समाधानकारक नाही, ९२८ कोटींची मागणी केली पण २७२ कोटीच मिळाले, अर्थखातं पैसे देत नसेल तर पगार कसा देणार, सरनाईकांकडून खंत व्यक्त
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेत द्या, प्रताप सरनाईकांची मागणी, आमच्या खात्याची फाईल अर्थमंत्र्यांकडे जात नाही ही शोकांतिका, सरनाईकांचं वक्तव्य,
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या सात तारखेपर्यंत झालेच पाहिजेत, प्रताप सरनाईकांचं वक्तव्य
आम्ही अतिरिक्त नाही, हक्काचे पैसे मागतोय, सरनाईक
एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी फक्त वल्गना करण्यातच हे सरकार धन्यता मानताना दिसतंय, रोहित पवारांची टीका, निम्म्या पगारात कर्मचाऱ्यांनी घर चालवायचं तरी कसं? रोहित पवारांचा सवाल
एसटीच्या जागांवर बीओटी तत्वावर बांधकाम करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठराव सादर होणार, एसटींच्या जागांवर ६० वर्षांसाठी बीओटी करारावर बांधकाम,